Pune DCC Bank Bharti 2026: पुणे जिल्ह्यात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित (Pune District Central Cooperative Bank Limited), पुणे यांनी शिपाई पदाच्या २८९ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे.
Pune DCC Bank Bharti 2026
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ०४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. लेखी परीक्षेची तारीख तसेच प्रवेशपत्र डाउनलोड करण्याबाबतची माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार किमान १२वी (उच्च माध्यमिक) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच १२वी समकक्ष मान्यताप्राप्त पदविका (Diploma) उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
Read Also: आयकर विभागात 10वी पास उमेदवारांसाठी नवीन भरती सुरू!
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे असावे. मात्र, बँकेत विविध एजन्सीमार्फत सलग किमान तीन वर्षे कंत्राटी पद्धतीने सेवा केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ४३ वर्षांपर्यंत सवलत देण्यात आली आहे.
शारीरिक पात्रता
शिपाई पदावरील जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यासाठी उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि सदृढ असणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क
या भरतीसाठी ₹१,६५०/- परीक्षा शुल्क आकारण्यात आले असून त्यावर १८% जीएसटी आणि सेवा शुल्क अतिरिक्त लागू राहील. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. शुल्काचा भरणा UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल वॉलेट याद्वारे ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागेल.
Read Also: १२वी पास उमेदवारांना ३९६ जागांसाठी नोकरीची संधी!
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड एकूण १०० गुणांच्या प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे. यामध्ये ७० गुणांची ऑफलाईन लेखी परीक्षा आणि ३० गुणांची कागदपत्र पडताळणी व मुलाखत असे दोन टप्पे असतील.
लेखी परीक्षा OMR पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेतली जाईल. परीक्षेचा कालावधी ७५ मिनिटांचा असून ती मराठी माध्यमात होईल. परीक्षेत शेती पतपुरवठा, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था तसेच बुद्धिमापन चाचणी या विषयांचा समावेश असेल.
लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्रत्येक जागेसाठी १:३ प्रमाणात उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीमध्ये व्यक्तिमत्त्व, संवाद कौशल्य, स्थानिक ज्ञान आणि शारीरिक क्षमता यांचे मूल्यांकन केले जाईल.
Read Also: बँकिंग क्षेत्रात 11,403 लिपिक पदांची मेगा भरती; ₹64,480/- पर्यंत मिळेल पगार
वेतन
निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीला ६ महिन्यांच्या परिविक्षाधीन (प्रोबेशन) कालावधीसाठी नियुक्ती केली जाईल. या कालावधीत त्यांना दरमहा ₹१२,०००/- एकत्रित मानधन दिले जाईल. परिविक्षाधीन कालावधी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर बँकेच्या नियमानुसार नियमित वेतनश्रेणी आणि इतर भत्ते लागू होतील.
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावा. अर्ज भरताना वैध ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, निर्धारित आकारातील पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी, आधार कार्ड आणि अधिवास प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे. प्रत्येक उमेदवाराला फक्त एकच अर्ज सादर करता येईल.
मदतीसाठी संपर्क
ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास उमेदवार help@punedccbank.com या ई-मेलवर संपर्क साधू शकतात. तसेच ८७९३६७५९०४ या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी ७:०० ते संध्याकाळी ७:०० या वेळेत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
Read Also: मुंबई उच्च न्यायालय येथे नोकरीची संधी; 52,400 पर्यंत मिळेल पगार!
रहिवासी अट
ही भरती फक्त पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी उमेदवारांसाठी लागू आहे. उमेदवाराकडे किमान १५ वर्षांचा अधिवास असावा आणि सन २०१८ नंतरचे सक्षम प्राधिकरणाने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे अनिवार्य आहे. पुणे जिल्ह्याबाहेरील विवाहित महिलांनी अर्ज करताना पतीचे रहिवासी प्रमाणपत्र तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.