मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू!

Mumbai MMRCL Bharti 2026: मुंबईत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण ३५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती नियमित, कंत्राटी आणि प्रतिनियुक्ती तत्त्वावर केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या या भरतीमध्ये महाव्यवस्थापक (इमारती आणि देखभाल), उप-महाव्यवस्थापक (विद्युत व यांत्रिक), उप-महाव्यवस्थापक (मुख्यालय व प्रणाली), सहाय्यक महाव्यवस्थापक (संरचना), सहाय्यक महाव्यवस्थापक (भू-तांत्रिक), सहाय्यक महाव्यवस्थापक (विद्युत व यांत्रिक), सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य), सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त), सहाय्यक महाव्यवस्थापक (साहित्य व्यवस्थापन) आणि उप-नगर नियोजक अशा विविध पदांचा समावेश आहे.

याशिवाय उप-अभियंता (मुख्यालय व प्रणाली), सहाय्यक व्यवस्थापक (साहित्य व्यवस्थापन), उप-अभियंता (स्थापत्य व प्रकल्प), उप-अभियंता (स्थापत्य व नियोजन), सहाय्यक अभियंता (पीएसटी), सहाय्यक अभियंता (विद्युत व यांत्रिक), कनिष्ठ व्यवस्थापक (वित्त), कनिष्ठ व्यवस्थापक (आयटी), प्रणाली विश्लेषक किंवा कनिष्ठ अभियंता-१, कनिष्ठ अभियंता-२ (विद्युत व यांत्रिक), कनिष्ठ अभियंता-२ (सिग्नल व दूरसंचार) आणि कनिष्ठ अभियंता-२ (डिझाइन, स्थापत्य व वास्तुकला) या पदांसाठीही भरती होणार आहे.

या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि वेतन वेगवेगळे आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या शिक्षणानुसार आणि अनुभवानुसार कोणत्या पदासाठी अर्ज करता येईल, हे अधिकृत जाहिरातीत तपासावे. तसेच संबंधित पदासाठी किती वेतन मिळणार आहे आणि वयाची अट काय आहे, याचीही माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

Read Also: बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी! नवीन जाहिरात प्रसिद्ध

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२६ साठी अर्ज प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ३० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत https://www.mmrcl.com/ या वेबसाइटला भेट द्यावी.

अर्ज करताना उमेदवारांनी आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती अचूक भरावी. अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्यावी. तसेच भरतीच्या अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात, जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.

मुंबई मेट्रोमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. या भरतीसाठी एकूण ३५ जागा उपलब्ध असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२६ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. भरतीची सविस्तर माहिती, पदानुसार पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि इतर अटी जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात जरूर वाचावी.

या गोष्टीचा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेद भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. सर्व सूचना लक्षात घेऊनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. या भरती संबंधित अधिक माहितीसाठी MMRCL यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.