युवकांसाठी बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याची मोठी संधी आहे. Union Bank of India ने ‘अप्रेंटिस’ (शिकाऊ उमेदवार) पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत तब्बल १८६५ रिक्त जागा उपलब्ध असून, पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून, अर्ज प्रक्रिया २९ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ मे २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
या भरतीमध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार, उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ, महाविद्यालय किंवा संस्थेतून पूर्ण केलेली असावी. संबंधित संस्था ही शासकीय, AICTE किंवा UGC मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे.
उमेदवाराचा पदवीचा निकाल ०१ एप्रिल २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर झालेला असावा. तसेच, पदवी उत्तीर्ण झाल्याची तारीख ही ०१ एप्रिल २०२२ नंतरची असावी, म्हणजेच ‘कट-ऑफ’ दिनांकाच्या मागील चार वर्षांच्या आत पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार गुणपत्रिका, तात्पुरते प्रमाणपत्र किंवा पदवी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
हे पण वाचा » १०वी पास उमेदवारांना आदिवासी विकास विभागात ४१६ जागांवर सरकारी नोकरीची संधी!
वयोमर्यादेच्या दृष्टीने पाहता, अर्जदाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. त्यामुळे नुकतेच पदवीधर झालेले आणि बँकिंग क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणारे तरुण-तरुणींसाठी ही सुवर्णसंधी आहे. अप्रेंटिसशिप कालावधीत उमेदवारांना मासिक स्टायपेंड देखील दिले जाणार आहे.
ग्रामीण किंवा अर्धशहरी शाखांमध्ये नियुक्त उमेदवारांना ₹१५,०००, शहरी शाखांमध्ये ₹१८,००० आणि महानगर शाखांमध्ये ₹२०,००० इतका मासिक भत्ता मिळेल.
ही भरती केवळ नोकरीची संधी नसून, बँकिंग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळवण्याची एक प्रभावी सुरुवात आहे. भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी किंवा कायमस्वरूपी बँकिंग करिअरसाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरू शकते. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
📑 PDF जाहिरात पाहण्यासाठी: https://drive.google.com/
👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: https://beep.bfsissc.com/
🌐 अधिकृत वेबसाईट: www.unionbankofindia.co.in
