आदिवासी विकास विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या आश्रम शाळांमध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘चौकीदार’ या पदासाठी तब्बल ४१६ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ही भरती होणार असल्याने राज्यभरातील उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
या भरतीअंतर्गत ‘चौकीदार’ पदासाठी अर्ज मागवले असून एकूण ४१६ जागा उपलब्ध आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे असावे.
परीक्षा शुल्काबाबत बोलायचे झाल्यास, अमागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क १००० रुपये ठेवण्यात आले आहे. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांना १० टक्के सवलत देण्यात आली असून त्यांच्यासाठी शुल्क ९०० रुपये आहे. माजी सैनिक तसेच दिव्यांग माजी सैनिक यांच्याकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
हे पण वाचा » RCFL मुंबईत १८८ पदांची मोठी भरती; ६०,००० पर्यंत मिळणार पगार!
निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रात नोकरीची संधी मिळणार असून वेतनश्रेणी १५,००० रुपये ते ४७,६०० रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारीख १८ मे २०२६ पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी अर्ज लवकर भरावा.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट: https://tribal.maharashtra.gov.in/ वर भेट द्यावी. अधिकृत जाहिरात https://drive.google.com/ व्यवस्थित वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://tdcwatchman2026.cbtexam.in/ या लिंक चा वापर करावा.
