Staff Selection Commission Recruitment

10वी, 12वी आणि पदवीधरांसाठी ३००३ जागांसाठी सरकारी नोकरीची संधी!

कर्मचारी निवड आयोगाने म्हणजेच Staff Selection Commission ‘फेज-१४ सिलेक्शन पोस्ट’ भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर केली असून देशभरातील विविध शासकीय विभागांमध्ये तब्बल ३००३ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. विशेष म्हणजे १०वी, १२वी आणि पदवीधर उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, कारण अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ मे २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत पदाचे नाव ‘फेज-XIV’ असे असून एकूण ३००३ जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत पाहता, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठातून १०वी, १२वी किंवा पदवी शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान १८ वर्षे ते कमाल ३० वर्षे अशी ठेवण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू राहील.

अर्ज शुल्काबाबत सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मात्र महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), माजी सैनिक (ESM) तसेच दिव्यांग (PWD) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पूर्णतः माफ करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात होणार असून उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.

हे पण वाचा » १०वी पास उमेदवारांना आदिवासी विकास विभागात ४१६ जागांवर सरकारी नोकरीची संधी!

पदवाटपाचा तपशील पाहता, सर्वसाधारण (UR) प्रवर्गासाठी १५३४ जागा, इतर मागासवर्गीय (OBC) साठी ६६७ जागा, अनुसूचित जाती (SC) साठी ३४६ जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) साठी २७१ जागा आणि अनुसूचित जमाती (ST) साठी १८५ जागा राखीव आहेत. त्यामुळे विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही भरती संधी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा घेतली जाणार असून त्यामध्ये एकूण १०० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक विभागासाठी २५ प्रश्न आणि ५० गुण असे वाटप असेल. परीक्षेचे विषय म्हणजे जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्रजी भाषा. एकूण २०० गुणांची परीक्षा होणार असून उमेदवारांनी सर्व विषयांचा संतुलित अभ्यास करणे आवश्यक आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही भरती सुवर्णसंधी आहे. कमी शैक्षणिक पात्रतेपासून पदवीधरांपर्यंत सर्वांना अर्जाची संधी आहे. त्यामुळे वेळ न दवडता अधिकृत अधिसूचना https://drive.google.com/ वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.gov.in/login या संकेतस्थळावर भेट द्या.

Scroll to Top