थेट मुलाखतीद्वारे ग्रंथपाल आणि लिपिक टंकलेखक पदांसाठी भरती

Collector Office Nanded Bharti 2026: नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ग्रंथपाल आणि लिपिक टंकलेखक या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. नोकरीचे ठिकाण नांदेड असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून ३० जुलै २०२६ रोजी होणाऱ्या मुलाखतीस उपस्थित राहावे. या भरतीमध्ये एकूण २ रिक्त पदे भरली जाणार असून निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता:

या भरतीमध्ये ग्रंथपाल पदासाठी एक जागा उपलब्ध आहे. या पदासाठी उमेदवार शासन सेवा किंवा महाविद्यालय/विद्यापीठातील ग्रंथपाल, उपग्रंथपाल किंवा सहायक ग्रंथपाल म्हणून पात्र असावा. उमेदवाराला उर्दू भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. त्याच्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी सुरू किंवा प्रस्तावित नसावी आणि सेवेत अडथळा निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिक कामात तो गुंतलेला नसावा. अर्जासोबत Conflict of Interest बाबतचे घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे. या पदासाठी मासिक मानधन ₹२५,००० देण्यात येईल.

लिपिक टंकलेखक पदासाठी देखील एक जागा उपलब्ध आहे. या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर MS-CIT प्रमाणपत्र, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराला उर्दू भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक असून टंकलेखक म्हणून किमान १ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी मासिक मानधन ₹१५,००० निश्चित करण्यात आले आहे.

Read Also: तलाठी पदांची तब्बल 1,539 जागांची भरती जाहीर!

अर्ज प्रक्रिया आणि निवड पद्धत

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असून निवड प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. मुलाखत ३० जुलै २०२६ रोजी मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, नांदेड जिल्हा सेतू समिती, संगणक कक्ष, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहावे.

भरतीसंबंधी सविस्तर माहिती, पात्रता, अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Read Also: पंजाब नॅशनल बँकेत 545 बँक अधिकारी पदांसाठी भरती

महत्त्वाची माहिती

  • भरती संस्था: जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
  • पदे: ग्रंथपाल (१), लिपिक टंकलेखक (१)
  • एकूण रिक्त जागा:
  • नोकरीचे ठिकाण: नांदेड
  • अर्ज पद्धत: ऑफलाइन
  • निवड प्रक्रिया: मुलाखत
  • मुलाखतीची तारीख: ३० जुलै २०२६
  • अधिकृत संकेतस्थळ: https://nanded.gov.in/
  • PDF जाहिरात: https://drive.google.com/