पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पुणे महानगरपालिका आरोग्य कार्यालय भरती २०२६ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत मुलाणी (सफाईसेवक), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि पशुवैद्यकीय अधिकारी या पदांचा समावेश आहे. एकूण १९ रिक्त जागा भरल्या जाणार असून, ही भरती ४४ दिवसांच्या करारावर आणि ठरावीक मासिक मानधनावर केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी आवश्यक कागदपत्रांसह पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहायचे आहे.
या भरतीमध्ये मुलाणी (सफाईसेवक) पदाच्या ७ जागा आहेत. या पदासाठी उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा. तसेच जनावरे कापण्याच्या कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २३,७८२ रुपये मानधन दिले जाईल. या पदासाठी कामाचे ठिकाण कोंढवा कत्तलखाना असून, कामाची वेळ सकाळी ५:३० ते दुपारी १:३० अशी राहील.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ११ जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. यासोबतच शासकीय अभियांत्रिकी कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. या जागा सर्वसाधारण म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी आहेत.
याशिवाय पशुवैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा भरली जाणार आहे. या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी (B.V.Sc) किंवा पदव्युत्तर पदवी (M.V.Sc) असणे आवश्यक आहे. संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कामाचा तीन वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना निवडीत प्राधान्य दिले जाईल. या पदासाठी दरमहा ६५,००० रुपये मानधन मिळणार आहे.
Read Also: अर्ज सुरू! रेल्वेत स्टेशन मास्टर पदासाठी 1250 जागांची भरती! वाचा सविस्तर…
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २२ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि कामाच्या अनुभवाच्या गुणांकनावर केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही भरती पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची असून, निवड झालेल्या उमेदवारांना फक्त ४४ दिवसांच्या करारावर काम करावे लागणार आहे. त्यामुळे या नियुक्तीच्या आधारे भविष्यात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याचा कोणताही हक्क सांगता येणार नाही.
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत आरोग्य कार्यालय, पशुवैद्यकीय विभाग, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या पत्त्यावर प्रत्यक्ष उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांनी येताना एक पासपोर्ट आकाराचा फोटो, शैक्षणिक पात्रतेची मूळ कागदपत्रे, अनुभवाची प्रमाणपत्रे आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित छायाप्रतींचा एक संच सोबत आणावा.
या भरतीसाठी अर्जाचा नमुना उमेदवारांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित झाल्यानंतर तेथेच दिला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि वेळेत सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहणे गरजेचे आहे.
इच्छुक उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्ती नीट वाचून आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवावी. तसेच भरतीसाठी जाण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचून माहिती एकदा तपासून घ्यावी.