NICL Assistant Recruitment 2026: सरकारी विमा क्षेत्रात नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) ने सहाय्यक (Assistant – Class III) पदांच्या 500 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना 7 ऑगस्ट 2026 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेअंतर्गत प्राथमिक परीक्षा 27 ऑगस्ट 2026 रोजी, तर मुख्य परीक्षा 30 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अधिकृत अधिसूचनेमध्ये पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदांचा तपशील, निवड प्रक्रिया, परीक्षा केंद्रे, सुधारित वेतन, अर्ज शुल्क तसेच इतर सर्व महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती तपासूनच अर्ज करावा.
NICL सहाय्यक भरती 2026 : महत्त्वाची माहिती
- संस्था: National Insurance Company Limited (NICL)
- पदाचे नाव: Assistant (Class III)
- एकूण रिक्त जागा: 500
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
- अधिकृत संकेतस्थळ: nationalinsurance.nic.co.in
NICL सहाय्यक भरती 2026 : महत्त्वाच्या तारखा
- अधिसूचना प्रसिद्ध : 18 जुलै 2026
- ऑनलाइन अर्ज सुरू : 18 जुलै 2026
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 7 ऑगस्ट 2026
- अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 7 ऑगस्ट 2026
Read Also: जिल्हा न्यायालय, बीड येथे सरकारी नोकरीची संधी; 47,600/- पर्यंत मिळेल पगार!
NICL सहाय्यक परीक्षा 2026
या भरतीसाठी दोन टप्प्यांमध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रथम प्राथमिक परीक्षा (Prelims) होईल. त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा (Mains) द्यावी लागेल. त्यानंतर प्रादेशिक भाषा चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल. सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
NICL सहाय्यक रिक्त जागा 2026
या भरतीअंतर्गत देशभरातील विविध राज्यांसाठी एकूण 500 सहाय्यक पदांची भरती करण्यात येणार आहे. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या असून उमेदवारांनी ज्या राज्यासाठी अर्ज करायचा आहे त्या राज्याची रिक्त पदांची माहिती अधिकृत जाहिरातीतून तपासावी.
NICL सहाय्यक पात्रता 2026
NICL सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. तसेच ज्या राज्यासाठी अर्ज केला जात आहे त्या राज्यातील प्रादेशिक भाषा वाचणे, लिहिणे आणि बोलणे येणे अनिवार्य आहे.
Read Also: थेट मुलाखतीद्वारे, सातारा येथे 12वी पास, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी
वयोमर्यादा
1 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 जुलै 1996 ते 1 जुलै 2005 (दोन्ही तारखा समाविष्ट) दरम्यान झालेला असावा.
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.
- अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): 5 वर्षे
- इतर मागासवर्गीय (OBC – Non Creamy Layer): 3 वर्षे
- दिव्यांग उमेदवार: 10 वर्षे
- माजी सैनिक: नियमानुसार
- विधवा, घटस्फोटित व न्यायालयीन विभक्त महिला: नियमानुसार
- NICL मधील विद्यमान कर्मचारी: 5 वर्षे
अर्ज प्रक्रिया
पात्र उमेदवारांनी NICL च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज प्रक्रियेमध्ये नोंदणी, अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्ज शुल्क भरणे या टप्प्यांचा समावेश आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2026 आहे. अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करणे हितावह ठरेल.
Read Also: ग्रॅजुएट उमेदवारांना नोकरीची संधी; ISRO मधे 244 पदांची भरती सुरू
NICL सहाय्यक वेतन 2026
NICL मध्ये सहाय्यक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनासह विविध भत्ते आणि सुविधा दिल्या जातात.
- वेतनश्रेणी: ₹22,405 ते ₹62,265
- प्रारंभिक मूलभूत वेतन: ₹22,405
- अंदाजे मासिक एकूण वेतन: सुमारे ₹40,000 (पोस्टिंगच्या ठिकाणानुसार बदलू शकते)
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) अंतर्गत होत असलेल्या पदभरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात (https://drive.google.com/) सविस्तर वाचावे. पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री केल्यानंतर आपले अर्ज विहित मुदतीत ऑनलाईन भरावेत. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक (https://ibpsreg.ibps.in/nicljul26/) ही आहे.
