भारतीय रेल्वे विभागाने देशभरातील तरुणांसाठी मोठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे भरती मंडळांमार्फत (RRBs) “सहाय्यक लोको पायलट” (Assistant Loco Pilot) पदांसाठी ‘केंद्रीय रोजगार अधिसूचना’ (RRB CEN 01/2026) जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ११,१२७ रिक्त पदे भरण्यात येणार असून, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची तयारी सुरू करावी, कारण अर्ज प्रक्रिया १५ मे २०२६ पासून सुरू झाली असून १४ जून २०२६ ही अर्जाची अंतिम तारीख देण्यात आली आहे. या भरती संबंधित अधिक माहिती आपण या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू..
या भरतीमध्ये “असिस्टंट लोको पायलट” हे पद प्रमुख असून, निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला ₹19,900/- प्रतिमाह वेतनश्रेणी दिली जाईल. शैक्षणिक पात्रतेसाठी किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, मात्र अधिक तपशीलांसाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे, तसेच नियमानुसार वयोमर्यादेत सूट देखील लागू असू शकते.
हे पण वाचा » ८ वा वेतन आयोग: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर!
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून, उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी उमेदवार खालील लिंकचा वापर करू शकतात.
अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/ , सविस्तर PDF जाहिरात – https://drive.google.com/ आणि ऑनलाइन अर्ज लिंक – https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्याची खात्री करावी.
सरकारी क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेची ही भरती एक अमूल्य संधी आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून या संधीचा नक्की लाभ घ्यावा.
