government job under Powergrid

६६० जागांसाठी सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी!

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (POWERGRID) कडून विविध नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण ६६० जागांसाठी ही सुवर्णसंधी असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

या भरती अंतर्गत डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल, सिव्हिल, सर्वे), कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (HR, फायनान्स अँड अकाउंट्स) तसेच कनिष्ठ तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (सर्वे) या पदांचा समावेश आहे. सरकारी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी ठरू शकते.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट http://www.powergrid.in वर जाऊन नोंदणी करावी. अर्ज प्रक्रिया २० एप्रिल २०२६ पासून सुरू होणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ मे २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी वेळेत अर्ज करणे अत्यावश्यक आहे.

अर्ज शुल्काबाबत, सामान्य प्रवर्ग, ओबीसी (एनसीएल) आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी डिप्लोमा ट्रेनी व संबंधित पदांसाठी ₹३००/- आणि कनिष्ठ तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (सर्वे) पदासाठी ₹२००/- शुल्क आकारले जाईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांना शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.

पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – १६ जागा
  • डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल) – ६ जागा
  • कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (एचआर) – ४ जागा
  • कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (फायनान्स अँड अकाउंट्स) – ४ जागा

पदांसाठी वयोमर्यादा कमाल २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी https://drive.google.com/file/d/view या लिंक वरील अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Scroll to Top