४६६ जागांवर ‘आपले सरकार सेवा केंद्र’ साठी मोठी भरती; ऑनलाइन अर्ज…

Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026: जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विविध शासन निर्णयांनुसार आणि भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती तसेच नगर परिषद क्षेत्रांमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (ASSK) सुरू करण्यासाठी केंद्र चालकांची निवड केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील एकूण ४६६ रिक्त केंद्रांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या निवड प्रक्रियेसाठी १०० गुणांची गुणांकन पद्धत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व पात्रता तपासून निर्धारित मुदतीत ऑनलाइन अर्ज साद करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

आपले सरकार सेवा केंद्र ४६६ जागांची भरती

जाहिरातीनुसार भंडारा जिल्ह्यात एकूण ४६६ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रातील मोठ्या संख्येने केंद्रांचा समावेश आहे.

क्षेत्र रिक्त केंद्रांची संख्या
संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्र ४५७
नगर परिषद भंडारा क्षेत्र
एकूण ४६६

Read Also: थेट मुलाखतीद्वारे मल्टीस्टेटमध्ये विविध पदांसाठी भरतीधी!

कोणाला अर्ज करता येणार?

आपले सरकार सेवा केंद्र’ चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जदार हा ज्या केंद्रासाठी अर्ज करणार आहे, त्या संबंधित भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

तसेच अर्जदाराला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. एका उमेदवाराला केवळ एका ‘आपले सरकार सेवा केंद्रासाठी’ अर्ज करता येणार आहे.

याशिवाय, शासनाच्या ९ जुलै २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे ऑनलाइन अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवणे उमेदवारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Also: पदवीधर, डिप्लोमा उमेदवारांसाठी प्रशिक्षणार्थी पदांची भरती

अर्ज कसा करायचा?

‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालकासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भंडारा जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन जाहिरात, पात्रता, अटी, नियम तसेच रिक्त केंद्रांची सविस्तर माहिती तपासावी आणि त्यानंतर ऑनलाइन अर्ज साद करावा.

ऑनलाइन अर्जासाठी महत्त्वाच्या तारखा

या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्जाची अंतिम तारीख आणि इतर महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

जाहिरात व अटी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणे : १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत

प्राप्त अर्जांची यादी प्रसिद्ध होणे : १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता

अर्जांवर आक्षेप नोंदविण्याचा कालावधी : २२ सप्टेंबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६

मुलाखतीस पात्र अर्जदारांची अंतिम यादी : १५ ऑक्टोबर २०२६

मुलाखतीचा कालावधी : १६ ऑक्टोबर २०२६ ते ३० ऑक्टोबर २०२६

अंतिम निवड यादी प्रसिद्ध होण्याची तारीख : १३ नोव्हेंबर २०२६

आक्षेप नोंदविताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जांवर आक्षेप केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू शाखेत लेखी स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत.

Read Also: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 289 जागांची मोठी भरती

अधिकृत संकेतस्थळे:

जाहिरात: https://drive.google.com/

अधिकृत वेबसाइट 1: https://bhandara.gov.in

अधिकृत वेबसाइट 2: https://asskbhandara.in/

उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजेच ई-मेल, पोस्ट किंवा हार्ड कॉपीद्वारे पाठविलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

अर्ज करण्यापूर्वी संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध असलेली फी, नियम, अटी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि रिक्त केंद्रांची सविस्तर यादी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी लक्षात घ्यावे…

भंडारा जिल्ह्यातील ४६६ ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी होणारी ही निवड प्रक्रिया संबंधित पात्र उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. मात्र, अर्जदाराने आपल्या क्षेत्राची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि इतर सर्व अटी तपासल्यानंतरच अर्ज करावा.

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार असून १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता बंद होणार आहे. त्यामुळे अंतिम मुदतीची वाट न पाहता पात्र उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे योग्य ठरेल.

अधिक माहितीसाठी उमेदवार dycentbhandara@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधू शकतात. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरील मूळ जाहिरात आणि नियम व अटी वाचणे आवश्यक आहे.