MCGM Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षण विभागाने गट-क मधील ‘शिक्षण सेवक’ संवर्गातील तब्बल 935 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीची संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या ‘पवित्र पोर्टल’ मार्फत ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
९३५ पदांचा तपशील
या भरतीमध्ये विविध माध्यमांसाठी तसेच विशेष विषयांसाठी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामध्ये मराठी माध्यमातील प्राथमिक शिक्षकांची ५२५ पदे, इंग्रजी माध्यमातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांची ३५२ पदे, चित्रकला शिक्षकांची १० पदे आणि संगीत शिक्षकांची ४८ पदे आहेत. अशा प्रकारे एकूण ९३५ शिक्षण सेवक पदे भरली जाणार आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला ३ वर्षांच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी दरमहा १६,००० रुपये निश्चित मानधन दिले जाणार आहे.
MCGM Recruitment 2026 शैक्षणिक पात्रता
माध्यमिक शिक्षक पदासाठी उमेदवाराने संबंधित माध्यमातून एस.एस.सी. किंवा एच.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे २ वर्षांची डी.एड. किंवा बी.एड. पदवी/पदविका असणे आवश्यक आहे. याशिवाय केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
चित्रकला आणि संगीत या विशेष शिक्षक पदांसाठी संबंधित कलेतील शासनमान्य पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त संस्थेमध्ये संबंधित विषयाच्या अध्यापनाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
या भरतीतील सर्व पदांसाठी संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असून उमेदवाराकडे एमएससीआयटी किंवा त्यासमकक्ष संगणक प्रमाणपत्र असणे अपेक्षित आहे. अर्ज करताना हे प्रमाणपत्र नसल्यास नियुक्तीनंतर २ वर्षांच्या आत संगणक अर्हता पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.
तसेच सर्व पदांसाठी उमेदवाराने माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये मराठी विषय घेतलेला असणे आवश्यक आहे. मराठी माध्यमाच्या उमेदवारांसाठी मराठी विषयात किमान १०० गुण, तर इतर माध्यमांच्या उमेदवारांसाठी किमान ५० गुण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा किती आहे?
या भरतीसाठी उमेदवारांचे वय शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) २०२५ नुसार विचारात घेतले जाणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे आहे. मागासवर्गीय आणि अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे आहे.
खेळाडू उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे, तर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे आहे. अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे ठेवण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही.
अर्ज कुठे करायचा?
या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी प्रथम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली भरतीची जाहिरात आणि त्यातील सर्व अटी काळजीपूर्वक वाचाव्यात. त्यानंतर शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ: https://portal.mcgm.gov.in
एकूण ९३५ शिक्षण सेवक पदांची ही भरती शिक्षक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, विषयाची अर्हता, टीईटी/सीटीईटी आणि इतर सर्व अटी अधिकृत जाहिरातीतून तपासून घेणे आवश्यक आहे.
अधिकृत जाहिरात: https://drive.google.com/
ऑनलाइन अर्ज: https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn