वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे 369 पदांची भरती सुरू | VNMKV Recruitment 2025

VNMKV Recruitment 2025: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth), परभणी यांनी गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील विविध रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. एकूण ३६९ रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

या पदांसाठी नोकरीचे ठिकाण परभणी असेल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑफलाइन अर्ज करावेत. या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे. या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून, उमेदवारांनी आपले अर्ज जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2025 आहे. अधिक माहितीसाठी, तुम्ही https://www.vnmkv.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. यामध्ये पहारेकरी पदासाठी 62 जागा उपलब्ध आहेत, तसेच मजूर पदासाठी 307 जागा भरण्यात येणार आहेत.

या भरतीसाठी अर्जदाराची वयोमर्यादा किमान 18 वर्षे ते 46 वर्षांपर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाचे शुल्क 1000/- रुपये असून, मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अनाथ यांच्यासाठी अर्ज शुल्क 900/- रुपये आहे.

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा