Thane DCC Bank Recruitment 2025: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (The Thane District Central Co-operative Bank Limited) ‘ज्युनियर बँकिंग असिस्टंट’, ‘शिपाई’, ‘सुरक्षारक्षक’ आणि ‘वाहन चालक’ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
या भरती अंतर्गत एकूण १६५ रिक्त जागा उपलब्ध आहेत. यापैकी ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी १२३ जागा, शिपाईसाठी ३६ जागा, सुरक्षारक्षकासाठी ५ जागा आणि वाहन चालकासाठी १ जागा आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने २९ ऑगस्ट २०२५ पूर्वी सादर करू शकतात. उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांदरम्यान असावे.
शैक्षणिक पात्रता आणि वेतनश्रेणी
ज्युनियर बँकिंग असिस्टंट: मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराकडे MSCIT किंवा तत्सम मान्यताप्राप्त संगणक कोर्सचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना रु. २०,००० इतके वेतन मिळेल.
शिपाई, सुरक्षारक्षक, आणि वाहन चालक: या पदांसाठी किमान ८वी ते १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना रु. १५,००० इतके वेतन मिळेल.
अर्ज शुल्क आणि संपर्क माहिती
अर्ज करताना, ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदासाठी रु. ९४४/- आणि इतर पदांसाठी रु. ५९०/- शुल्क भरावे लागेल. अधिक माहितीसाठी, उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट thanedistrictbank.com ला भेट देऊ शकतात किंवा कार्यालयीन वेळेत ९१५६०३२५९८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |