RTMNU नागपूर विद्यापीठात 110 जागांची भरती! 40,000 रुपये पगार, अर्जाची शेवटची तारीख 28 जून

RTMNU Recruitment 2025: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. यासाठी एकूण ११0 पदे उपलब्ध आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची आहे. उमेदवाराला रुजू झाल्याच्या तारखेपासून ते ३० एप्रिल, २०२६ पर्यंतच या पदावर काम करता येईल. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४०,००० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2025 आहे. अर्जदारांनी या वेळेतच विद्यापीठाने नमूद केलेल्या संकेतस्थळावर आपला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. त्यानंतर अर्जाची छाननी केली जाईल. छाननी पूर्ण झाल्यावर पात्र उमेदवारांची यादी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. ही यादी तपासण्यासाठी उमेदवारांनी नियमितपणे वेबसाईटला भेट देत राहावी. या भरतीसाठी मुलाखतींच्या तारखा देखील विद्यापीठाच्या वेबसाईटवरच जाहीर केल्या जातील.

पदे आणि पदसंख्या

अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी एकूण १४ पदे आहेत. अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी ०८ जागा उपलब्ध आहेत. विमुक्त जाती (VJ(A)) साठी ०३ पदे, तर भटक्या जमाती (NT(B)) साठी ०३ पदे आहेत. विशेष मागास प्रवर्ग (NT(C)) साठी ०४ पदे असून, भटक्या जमाती (NT(D)) साठी ०२ पदे राखीव आहेत. विशेष मागास प्रवर्ग (SBC) साठी ०२ पदे, इतर मागास प्रवर्ग (OBC) साठी सर्वाधिक २१ पदे, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) साठी ११ पदे, आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) साठी ११ पदे उपलब्ध आहेत. खुल्या प्रवर्गासाठी (OPEN) ३१ पदे उपलब्ध आहेत. अशा प्रकारे, एकूण ११० जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.nagpuruniversity.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 500/- रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300/- रुपये आहे. प्रत्येक पदासाठी उमेदवारांना स्वतंत्र अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. शुल्क भरल्यानंतर अर्जदाराच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर त्याची रीतसर पावती पाठवली जाईल.

हे पण वाचा » RRB 2025 मेगा भरती सुरू! 6180 जागा, ₹29,200 पगार, पात्रता, अर्ज लिंक, सर्व काही एका क्लिकवर!

भरतीची अर्ज प्रक्रिया

अर्ज करतेवेळी उमेदवारांनी आपली सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरावी, जसे की फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक कागदपत्रे, इत्यादी. सर्व माहिती भरून झाल्यानंतर कागदपत्रे अपलोड करावीत आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून आपला अर्ज सादर करावा. यशस्वीरित्या अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंटआऊट काढून घ्यावी.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया संदर्भात काही अडचणी असल्यास, ऑफिस कामकाजाच्या वेळेत तुम्ही विद्यापीठाच्या हेल्पलाइन क्रमांक ९१७५०२३३३४ वर संपर्क साधू शकता. विद्यापीठाला प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांनी, विद्यापीठाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीला येत असताना उमेदवारांनी आपली सर्व मूळ कागदपत्रे तसेच भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट सोबत आणणे आवश्यक आहे.

हे पण वाचा » पदवीधरांना LIC HFL मध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या पात्रता, पगार आणि अर्ज…

अर्जदारांसाठी महत्वाच्या सूचना

या नियुक्त्या पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाच्या आहेत. निवडलेल्या उमेदवाराला शैक्षणिक सत्रादरम्यान केवळ 8 सामान्य सुट्ट्या मिळतील. प्रत्येक पदासाठी उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज करताना, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र (जिथे लागू असेल) अपलोड करणे अनिवार्य आहे. निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारची शिफारस चालणार नाही.

मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता (TA) दिला जाणार नाही. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराने पात्रता आणि इतर सर्व आवश्यक अटी पूर्ण केलेल्या असाव्यात.

अधिकृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत होत असलेल्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. अधिक माहितीसाठी RTMNU यांच्या संकेतस्थळावर भेट द्या.

Leave a Comment