RRB Recruitment 2025: भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षित आणि सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या रेल्वे भरती बोर्डाने (Railway Recruitment Board) विविध पदे भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत संपूर्ण देशभरामध्ये 6180 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत तंत्रज्ञ ग्रेड III ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी रेल्वे भरती बोर्डाच्या https://www.rrbapply.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. RRB च्या तंत्रज्ञ ग्रेड I सिग्नल आणि तंत्रज्ञ ग्रेड III पदांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, भरती संबंधित महत्त्वाच्या तारखा, पगार, इत्यादी माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 28 जून 2025 रोजी पासून सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 (रात्री 11:59) वाजेपर्यंत आहे. यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
तंत्रज्ञ ग्रेड I सिग्नल हे पद 7 व्या वेतनश्रेणी नुसार पे लेव्हल 5 अंतर्गत येते. या पदासाठी सुरुवातीचे वेतन ₹29,200/- आहे. या पदासाठी अंदाजे 180 रिक्त जागा उपलब्ध आहेत. यासाठी अर्जदारांचे वय 1 जुलै 2025 रोजी 18 ते 33 वर्षांच्या दरम्यान असावे.
तंत्रज्ञ ग्रेड III हे पद 7 व्या वेतनश्रेणी नुसार पे लेव्हल 2 अंतर्गत येते. या पदासाठी सुरुवातीचे वेतन ₹19,900/- आहे. या पदासाठी अंदाजे 6000 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदासाठी अर्जदारांचे वय 1 जुलै 2025 रोजीचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्ज प्रक्रिया
या भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. प्रत्येक उमेदवार फक्त एकाच रेल्वे भरती बोर्डासाठी आणि एका विशिष्ट वेतनश्रेणीसाठी अर्ज करू शकतो. जर एखाद्या उमेदवाराला वेगवेगळ्या पदासाठी आणि वेतनश्रेणीसाठी अर्ज करायचा असेल, तर त्याने त्यासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक असणार आहे.
सर्व अर्जदारांना सुचित करण्यात येते की, ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी त्यांच्या प्राथमिक माहितीची आधार (Aadhar) द्वारे पडताळणी करून घ्यावी. यामुळे भरती प्रक्रिये दरम्यान होणारी गैरसोय आणि विलंब टाळता येईल. यशस्वीरित्या आधार पडताळणी करण्यासाठी उमेदवाराचे आधार कार्ड वरील नाव आणि जन्मतारीख हे दहावीच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर असणाऱ्या तपशिलांशी 100% जुळणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या आधार कार्ड वरील फोटो आणि बायोमेट्रिक (बोटांचे ठसे आणि डोळे) अद्ययावत असल्याची खात्री करून घ्यावी.
महत्त्वाच्या सूचना
ही अधिसूचना केवळ सूचनात्मक आहे. या भरती संबंधीची अधिक सविस्तर आणि सर्वसमावेशक माहिती असणारी सूचना (CEN) क्र. 02/2025 दिनांक 28 जून 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये सहभागी झालेल्या सर्व आरआरबी (RRB) च्या अधिकृत वेबसाईटवर देखील याची अधिसूचना प्रकाशित करण्यात येईल. पुढील येत्या काळामध्ये भरती संबंधित कोणतीही सूचना, शुद्धिपत्रक, अधिक माहिती किंवा महत्त्वाच्या सूचनांसाठी उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाईटवर नियमितपणे भेट देत राहावी. जेणेकरून भरती विषयक सर्व सूचनांची माहिती उमेदवारांना वेळोवेळी मिळत राहील.
हे पण वाचा » पदवीधरांना LIC HFL मध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या पात्रता, पगार आणि अर्ज…
सहभागी RRB आणि त्यांच्या अधिकृत वेबसाइट्स खालीलप्रमाणे आहेत:
महत्त्वाच्या तारखा
• अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: २८ जून २०२५
• अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: २८ जुलै २०२५ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
• सूचक नोटीसची तारीख: २१ जून २०२५
अधिकृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज
रेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत होत असलेल्या या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. अधिक माहितीसाठी रेल्वेच्या संकेतस्थळावर: https://indianrailways.gov.in/railwayboard/ भेट द्या.

My name is Manish Mule, and I bring four years of dedicated experience to content creation. I currently serve as a Digital Content Producer for the Kolgaonlive24.in web portal.