पंजाब आणि सिंध बँकेत ७५० जागांची भरती; 86,000 पर्यंत मिळेल पगार | Punjab and Sind bank recruitment 2025

Punjab and Sind bank recruitment 2025: पंजाब अँड सिंध बँकेने ‘लोकल बँक ऑफिसर्स’ या विविध पदांसाठी एकूण ७५० रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ०४ सप्टेंबर २०२५ पूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी, तुम्ही बँकेची अधिकृत वेबसाइट punjabandsindbank.co.in ला भेट देऊ शकता.

पदांची माहिती:

पदाचे नाव: लोकल बँक ऑफिसर

एकूण पदे: ७५०

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा: २० ते ३० वर्षे

अर्ज शुल्क:

• SC/ST/PWD उमेदवारांसाठी: ₹१०० + जीएसटी आणि पेमेंट गेटवे शुल्क
सामान्य (General), EWS आणि OBC उमेदवारांसाठी: ₹८५० + जीएसटी आणि पेमेंट गेटवे शुल्क

अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०४ सप्टेंबर २०२५

वेतन: ₹४८,४८० ते ₹८५,९२० प्रति महिना