NVS Pune Bharti 2025: नवोदय विद्यालय समिती (NVS) (शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत एक स्वायत्त संस्था) द्वारे प्रादेशिक कार्यालय पुणे येथे “डेटा एंट्री ऑपरेटर” (Data Entry Operator) पदासाठी कंत्राटी भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण ०१ रिक्त जागा उपलब्ध आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार ०७ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी (walk-in interview) उपस्थित राहू शकतात. या नोकरीचे ठिकाण पुणे आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाईल.
मुलाखतीसाठीचा पत्ता, एनव्हीएस प्रादेशिक कार्यालय, पुणे हा आहे. या पदासाठी वेतनश्रेणी दरमहा रु. २२०००/- (एकत्रित) अशी देण्यात येईल. मुलाखतीची तारीख ०७ जुलै २०२५ असून, अधिक माहितीसाठी तुम्ही www.navodaya.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी, उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे संगणक ज्ञान/कौशल्ये असणे गरजेचे आहे. मुलाखतीला उपस्थित राहताना उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सोबत ठेवावी. या भरती विषयी अधिक माहितीसाठी नवोदय विद्यालय समिती, पुणे यांच्या संकेतस्थळावर भेट द्या.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |

माझे नाव मनीष मुळे आहे. मी एक कंटेंट रायटर आहे आणि मागील 4 वर्षांपासून नोकरी, सरकारी योजना, इत्यादी महत्वाच्या विषयांवर ब्लॉग आर्टिकल लिहितो. आता मी kolgaonlive24.in या वेबसाइट साठी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून काम करतो आहे.