नितीन गडकरींची मोठी घोषणा, ₹3000 मध्ये वर्षभर टोल फ्री? फास्टटॅग वार्षिक पास कसा काढायचा? जाणून घ्या!

Nitin Gadkari Fastag Annual Pass: देशात नवीन टोल धोरण आणण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (Union Ministry of Road Transport and Highways) एक योजना तयार करत असल्याचे बोलले जात होते. वाहन धारकांचा देशांतर्गत प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी टोल संदर्भात काही नव्या सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट वर पोस्ट करून सांगितले की, फास्टटॅग चे वार्षिक पास (Annual FASTag Pass) लवकरच जाहीर होणार आहेत, याचा देशभरातील वाहनधारकांना लाभ मिळणार आहे. आता हे पास कधी आणि कसे लागू होणार? त्याचबरोबर वाहनधारकांना तो पास मिळविण्यासाठी काय करावे लागेल? याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले…

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केलेल्या X पोस्ट नुसार हा वार्षिक फास्टटॅग पास वाहनधारकांना फक्त एकदाच 3000 रुपये भरून मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा पास ऍक्टिव्ह झाल्यानंतर तो एक वर्ष किंवा 200 ट्रिप्स यापैकी जे आधी होईल त्यासाठी वैध असणार आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही 200 टोल प्लाझा वर प्रवास पूर्ण केला तर तुम्हाला हा पास पुन्हा नव्याने रिचार्ज करावा लागेल. या पास मुळे एका ट्रिपसाठी सरासरी फक्त ₹१५ इतका खर्च येईल. नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट 2025 पासून हा 3000 रुपयांचा फास्टटॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येणार आहे.

हा पास फक्त खाजगी आणि गैरव्यवसायिक वाहनांसाठी म्हणजेच कार, जीप, व्हॅन, इत्यादींसाठी लागू असणार आहे. देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर हे पास लागू होतील. कोणत्याही व्यावसायिक वाहनधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

How to get fastag annual pass

वाहनधारकांना वार्षिक फास्टटॅग सहज उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच राजमार्ग प्रवास ॲप, NHAI तसेच MoRTH यांसारख्या अधिकृत वेबसाईटवर एक स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या लिंक द्वारे पात्र वाहनधारक या अॅन्युअल फास्टटॅग पास साठी अप्लाय करू शकतील किंवा त्या पासचे नूतनीकरण करू शकतील.

हे पण वाचा » मोफत संधी! UIDAI ने आधार अपडेटची मुदत वाढवली; जाणून घ्या प्रक्रिया आणि शेवटची तारीख!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, हे नवीन धोरण 60 किलोमीटर परिघात असलेल्या टोल प्लाझा संबंधित अनेक वर्षांपासूनचे प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. एकसंध आणि व्यवहारांमध्ये सुलभता आणून टोल पेमेंट अधिक सोपे आणि पारदर्शक होणार आहे. या वार्षिक फास्टटॅग पास मुळे अनेक पात्र वाहनधारकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. विशेषतः सतत फास्टटॅग रिचार्ज करण्याची गरज राहणार नाही.

हा फास्टटॅग पास केवळ राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगदी महामार्गावरील टोल प्लाजांवर वैद्य असणार आहे. राज्य महामार्ग किंवा स्थानिक प्राधिकरणांच्या अखत्यारीत येणाऱ्या टोल प्लाझावर फास्टटॅग नेहमीप्रमाणे काम करेल आणि नेहमीचे टोल दर लागू होतील. प्रत्येक वेळी हा वार्षिक पास मिळविण्यासाठी नवीन फास्टटॅग खरेदी करण्याची आवश्यकता असणार नाही. वाहनधारक सध्या वापर करीत असलेल्या टॅग सोबत हा पास जोडू शकतात. जर कोणी वाहनधारक हा वार्षिक पास घेऊ इच्छित नसेल तर त्याला नेहमीप्रमाणे फास्टटॅग वापरून टोल भरावा लागणार आहे. एक ट्रीप म्हणजे, तुम्ही एका दिवसात ये-जा करताना जेवढे टोल प्लाझा पार कराल, तेवढ्या ‘ट्रिप’ गणल्या जातील.

हे पण वाचा » RTMNU नागपूर विद्यापीठात 110 जागांची भरती! 40,000 रुपये पगार, अर्जाची शेवटची तारीख 28 जून

वार्षिक फास्टॅग पास संबंधी 10 महत्त्वाच्या गोष्टी

• वार्षिक पास केवळ वाहनाची आणि त्यासंबंधीच्या फास्टॅगची पडताळणी केल्यानंतरच जारी केला जाईल.
• जर तुमच्या वाहनावर आधीपासूनच फास्टॅग असेल, तर त्यावरच वार्षिक पास सक्रिय केला जाईल. यासाठी नवीन फास्टॅग घेण्याची गरज नाही.
• फास्टॅग वाहनाच्या योग्य ठिकाणी लावलेला असणे आवश्यक आहे.
• फास्टॅग तुमच्या वाहनाच्या नोंदणी क्रमांकाशी (रजिस्ट्रेशन नंबर) जोडलेला असणे अनिवार्य आहे.
• तुमचा फास्टॅग ‘ब्लॅकलिस्टेड’ नसावा. जर फास्टॅग ब्लॅकलिस्टेड असेल, तर वार्षिक पास सक्रिय होणार नाही.
• हा वार्षिक पास केवळ राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरच वैध असेल.
• राज्यांच्या अखत्यारीतील येणारे महामार्ग (स्टेट हायवे) वर हा पास लागू होणार नाही. राज्य महामार्गांवर आधीचेच टोल नियम लागू असतील.
• वार्षिक पास हस्तांतरित (ट्रान्सफर) करता येणार नाही. हा पास केवळ ज्या वाहनासाठी जारी केला आहे, त्याच वाहनासाठी वैध राहील.
• जर वार्षिक पास इतर कोणत्याही अनधिकृत वाहनासाठी वापरल्यास तो लगेच डीअॅक्टिवेट केला जाईल.
• हा वार्षिक फास्टटॅग पास घेणे अनिवार्य नाही. जर एखाद्या वाहनचालकाला वार्षिक पास घ्यायचा नसेल, तर तो सामान्य फास्टॅग वापरूनही टोल भरू शकतो.

Leave a Comment