MPSC मार्फत पदवीधरांना विविध पदांसाठी नोकरीची संधी! | MPSC Group B Recruitment 2025

MPSC Group B Recruitment 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ४३० पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यात ड्रग इन्स्पेक्टर, अधीक्षक, राज्य कर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी यांसारख्या पदांचा समावेश आहे.

एकूण पदसंख्या: ४३०

पदांनुसार तपशील:

औषध निरीक्षक: १०९ पदे
अधीक्षक आणि तत्सम पदे: ३६ पदे
राज्य कर निरीक्षक: २८३ पदे
सहायक कक्ष अधिकारी: ०३ पदे

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बाबी:

शैक्षणिक पात्रता: पदांच्या आवश्यकतेनुसार

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

वयोमर्यादा: १९ ते ३८ वर्षे

अर्ज शुल्क:

  • खुला वर्ग: रु. ७१९/-
  • मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल/अनाथ/अपंग: रु. ४४९/-

अधिक माहितीसाठी, एमपीएससीची अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in ला भेट द्या.

अधिकृत जाहिरात (औषध निरीक्षक) येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात (अधीक्षक आणि तत्सम पदे) येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात (राज्य कर निरीक्षक + सहायक कक्ष अधिकारी) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा