महिलांना मिळणार मोफत पीठाची गिरणी; असा करा अर्ज..! | Mofat Pithachi Girni Yojana 2025

Mofat Pithachi Girni Yojana 2025: ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिलांना मोफत पीठ गिरणी वाटप (Free Flour Mill Scheme) करण्याची योजना 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे, महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वबळावर व्यवसाय उभा करण्याची संधी देणे हा आहे. महिलांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना शासनाकडून महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. मोफत पीठ गिरणी वाटप योजना ही त्याचाच एक भाग मानली जाते.

राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करता यावा म्हणून राज्य शासनाकडून मोफत पीठ गिरणी योजना राबविण्यात येत आहे.

Mofat Pithachi Girni Yojana 2025

या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना शासन अनुदानावर मोफत पीठ गिरणी उपलब्ध करून दिली जाते. या गिरणीमुळे महिला घरच्या घरी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात. आर्थिक दृष्ट्या दुर्बल तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना महत्वपूर्ण ठरत आहे. या योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून गिरणी खरेदीसाठी 90 टक्के अनुदान दिले जाते. उर्वरित 10 टक्के रक्कम महिलांना स्वतः भरावी लागते.

या योजनेचा लाभ विशेषतः ग्रामीण भागातील महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील महिलांना दिला जातो. या व्यवसायातून अगदी छोट्या गुंतवणुकीतून महिलांना उत्पन्नाची संधी मिळते आणि त्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात.

पीठ गिरणी व्यवसायाचे फायदे

धान्य दळणे ही ग्रामीण भागातील लोकांची मुख्य गरज मानली जाते. त्यामुळे पीठ गिरणीचा व्यवसाय हा कायमस्वरूपी चालणारा आणि ठराविक उत्पन्न देणारा आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता नसते. अगदी कमी खर्चात आणि छोट्या जागेत देखील हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.

या व्यवसायासाठी कोणतेही तांत्रिक ज्ञान आणि प्रशिक्षण गरजेचे नसल्यामुळे कोणतीही व्यक्ती सहजपणे हा व्यवसाय सुरू करू शकते. या व्यवसायासाठी सरकारकडून अनुदान मिळत असल्याने आर्थिक भांडवल देखील कमी लागते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना मोफत पीठ गिरणी उपलब्ध करून देण्यासाठी योजना सुरू केली आहे.

मोफत पीठ गिरणी योजनेची उद्दिष्टे

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या योजनेचा प्रमुख हेतू आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या योजनेद्वारे प्रोत्साहन दिले जाते. ग्रामीण भागातील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे हा देखील योजनेचा प्रमुख उद्देश आहे. महिलांना अर्थसाहाय्य पुरवून घरच्या घरी उद्योग सुरू करण्यासाठी मदत करणे, त्यातून रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करणे आणि एक मजबूत आर्थिक साखळी निर्माण करणे हा देखील या योजनेचा उद्देश आहे.

अनुसूचित जाती, जमातीतील महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना व्यवसायाच्या समान संधी उपलब्ध करून देणे. ज्यामुळे कोणताही सामाजिक भेदभाव राहणार नाही, हा सुद्धा या योजनेचा उद्देश आहे. महिलांनी सुरू केलेल्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे त्यांच्या कुटुंबाच्या एकूण उत्पन्नात भर पडेल आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. त्याचबरोबर, कुटुंबाची आर्थिक स्थिती देखील मजबूत होण्यास मदत होईल.

हे पण वाचा » लाडक्या बहिणींना जून महिन्याचे १५०० रुपये ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार!

योजनेची आवश्यक पात्रता आणि अटी:

या योजनेसाठी अर्ज करणारी महिला अर्जदार ही महाराष्ट्र राज्याची स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे ते कमाल ६० वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जदार महिला अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील असावी. तिच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे १ लाख 20 हजारांपेक्षा कमी असावे. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाईल. अर्जदार महिलेच्या नावावर तिचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

मोफत पीठ गिरणी योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार महिला उमेदवाराकडे ओळख पुरावा म्हणून आधार कार्डाची प्रत, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक किंवा स्टेटमेंट, नुकताच काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो, दारिद्र्य रेषेखालील कार्ड असल्यास त्याची प्रत, शासनमान्य विक्रेत्याकडून गिरणीचे घेतलेले कोटेशन, इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा » मोफत संधी! UIDAI ने आधार अपडेटची मुदत वाढवली; जाणून घ्या प्रक्रिया आणि शेवटची तारीख!

अर्ज करण्याची प्रक्रिया:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेला स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देणे आवश्यक आहे. कार्यालयात भेट दिल्यावर तेथील संबंधित कर्मचाऱ्यांकडून अर्जाचा फॉर्म घ्यावा. हा फॉर्म काळजीपूर्वक भरून, आवश्यक ती सर्व माहिती नमूद करावी.

फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत संलग्न करावी, जसे की ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी. संपूर्ण अर्ज आणि कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर तो अर्ज संबंधित कार्यालयात सादर करावा. यानंतर, प्राप्त अर्जाची छाननी केली जाईल व अर्जदार पात्र आहे की नाही याची पडताळणी करण्यात येईल. पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान मंजूर करण्यात येईल आणि हे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.