LIC HFL Apprentice Recruitment 2025: एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) कडून पदवीधर उमेदवारांसाठी प्रशिक्षणार्थी पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत देशातील LIC HFL च्या विविध कार्यालयांमध्ये एकूण २५० जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल. दिनांक 13 जून 2025 पासून या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 जून 2025 पर्यंत आहे.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 1 जून 2025 रोजी किमान 20 ते कमाल 25 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेडवरणे 1 जून 2025 पर्यंत कोणत्याही शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे.
निवड प्रक्रिया
या भरतीची निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षेद्वारे होईल. ही प्रवेश परीक्षा BFSI सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे घेतली जाईल. या परीक्षेमध्ये बँकिंग, गुंतवणूक आणि विमा यासंबंधी मूलभूत प्रश्न आणि क्वांटिटेटिव्ह, रिझनिंग, डिजिटल, कॉम्प्युटर लिटरसी आणि इंग्रजी या विषयांवर आधारित १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. या परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल.
या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क, सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 944/- रुपये, SC/ST आणि महिला उमेदवारांसाठी 878/- रुपये आणि पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी 472/- आहे.
प्रवेश परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या कार्यालयामध्ये उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी आणि वैयक्तिक मुलाखत घेण्यासाठी बोलावण्यात येईल.
अर्ज प्रक्रिया
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम भारत सरकारच्या NATS पोर्टल वर स्वतःची नोंदणी करून घ्यावी. त्यानंतर उमेदवारांना एक लॉगिन ID आणि पासवर्ड दिला जाईल, तो त्यांनी जपून ठेवावा. कारण प्रशिक्षणा दरम्यान विविध कामांसाठी त्याची आवश्यकता भासू शकते.
NATS पोर्टलवर लॉगइन केल्यानंतर उमेदवार एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेली शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदासाठीची जाहिरात पाहू शकतात. NATS पोर्टल द्वारे मिळालेला एनरोलमेंट आयडी उमेदवारांनी जपून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
यशस्वीरित्या अर्ज केलेल्या उमेदवारांना बीएफएसआय एसएससी (info@bfsissc.com) यांच्याकडून ई-मेल द्वारे प्रशिक्षण संबंधित किंवा जिल्हा निवड आणि अर्ज शुल्क भरण्यासंबंधीची सर्व माहिती वेळोवेळी कळविण्यात येईल.
अर्ज शुल्क आणि मासिक मानधन
या भरतीच्या अर्जाचे प्रवेश शुल्क भरण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे. यासंबंधीची प्रवेश परीक्षा 3 जुलै 2025 रोजी घेतली जाणार आहे. तसेच कागदपत्राची पडताळणी आणि उमेदवाराची वैयक्तिक मुलाखत अंदाजे 8 जुलै 2025 ते 9 जुलै 2025 या दरम्यान घेण्यात येणार आहे. अंतिमतः निवड केलेल्या उमेदवारांना त्यांचे ऑफर लेटर 10 जुलै 2025 ते 11 जुलै 2025 या कालावधीमध्ये देण्यात येऊ शकते.
हा कार्यक्रम 12 महिन्यांसाठी घेण्यात येणार आह. यासाठी निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांना प्रति महिना रु. १२०००/- विद्या वेतन दिले जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत यशस्वीरित्या शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व उमेदवारांना प्राविण्य प्रमाणपत्र दिले जाणार आहे. नोकरी संबंधी संधींबाबत BBFSI सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याशी संपर्क साधू शकता.
जिल्हानिहाय रिक्त जागा
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यानुसार रिक्त पदांचा तपशील आपण जाणून घेऊ. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यासाठी 2 जागा, अमरावतीसाठी 1 जागा, छत्रपती संभाजीनगर साठी 1 जागा, जळगाव साठी 2 जागा, कल्याण साठी 2 जागा, कोल्हापूरसाठी 1 जागा, मुंबईसाठी 7 जागा, नागपूर साठी 2 जागा, नाशिक साठी 2 जागा, नवी मुंबईसाठी 1 जागा, पुणे साठी 7 जागा, सातारा साठी 2 जागा, ठाणे साठी 1 जागा आणि वर्धा जिल्ह्यासाठी 1 जागा उपलब्ध आहेत.
परीक्षा पद्धती
या भरतीच्या प्रवेश परीक्षा संबंधित माहिती द्यायची झाल्यास, या परीक्षेत एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. या प्रश्नांमध्ये मूलभूत बँकिंग, गुंतवणूक, विमा, तर्कशास्त्र, डिजिटल साक्षरता, संगणक साक्षरता आणि इंग्रजी या विषयासंबंधीत प्रश्न विचारले जाणार आहेत. या परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा असेल. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. उमेदवाराला स्वतःच्या घरून ‘इन फ्रंट कॅमेरा’ ही परीक्षा द्यावी लागणार आहे. उमेदवार आपल्या स्मार्टफोनचा वापर करून सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात.
अधिकृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी LIC HFL यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.

My name is Manish Mule, and I bring four years of dedicated experience to content creation. I currently serve as a Digital Content Producer for the Kolgaonlive24.in web portal.