Jalgaon DCC Bank Recruitment 2025: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (जेडीसीसी बँक) ने नुकतीच लिपिक (सहाय्यक कर्मचारी) पदासाठी एकूण १२५ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी १२ सप्टेंबर २०२५ पूर्वी दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा.
पदांची माहिती:
पदाचे नाव: लिपिक (सपोर्ट स्टाफ)
एकूण जागा: १२५
नोकरीचे ठिकाण: जळगाव
शैक्षणिक पात्रता:
अर्जदार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, मात्र कला शाखेतील पदवीधर (B.A. M.A.) वगळता. पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. उमेदवाराकडे MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवार संगणक शाखेचा पदवीधर असेल किंवा जी.डी.सी. अँड ए. परीक्षा उत्तीर्ण असेल, तर त्याला प्राधान्य दिले जाईल.
इतर आवश्यक माहिती:
वयोमर्यादा: २१ ते ३५ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
निवड प्रक्रिया: मुलाखती
अर्ज पाठवण्याचा पत्ता: दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १२ सप्टेंबर २०२५
अधिकृत वेबसाईट: https://jdccbank.com/en/
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |