IRCTC Recruitment 2025: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ने अप्रेंटिस पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. एकूण २८ रिक्त जागांसाठी ही भरती असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार ०२ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पदांनुसार जागा आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत:
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) – एकूण १८ जागा. यासाठी उमेदवारांकडे मॅट्रिक्युलेशन आणि NCVT/SCVT शी संलग्न आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
कार्यकारी – खरेदी (Executive – Purchase) – एकूण ३ जागा. यासाठी उमेदवार वाणिज्य (Commerce), सीए इंटर (CA Inter), सप्लाय चेन (Supply Chain) किंवा तत्सम विषयात पदवीधर असावा.
एचआर एक्झिक्युटिव्ह – वेतन आणि कर्मचारी डेटा व्यवस्थापन (HR Executive – Payroll & Employee Data Management) – एकूण ३ जागा. यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
मार्केटिंग ऑपरेशन्स आणि ॲनालिटिक्स (Marketing Operations & Analytics) – एकूण ४ जागा. यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे आणि अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी, तुम्ही https://www.irctc.com/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |