इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 पदांसाठी भरती सुरू | Indian Overseas Bank Recruitment 2025

Indian Overseas Bank Recruitment 2025: इंडियन ओव्हरसीज बँक विविध पदांसाठी भरती करत आहे. बँक अप्रेंटिस पदाच्या एकूण ७५० रिक्त जागा भरणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार २० ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख १० ऑगस्ट २०२५ आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे.

जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ९४४ रुपये आहे, तर एससी, एसटी आणि महिला उमेदवारांसाठी ७०८ रुपये आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी ४७२ रुपये शुल्क आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५,००० रुपये वेतन मिळेल. अधिक माहितीसाठी, उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईट https://www.iob.in/ ला भेट देऊ शकतात.

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा