Indian Army Agniveer Admit Card Download: इंडियन आर्मी कडून अग्नीवीर कॉमन एंट्रन्स एक्झाम 2025 चे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र (Indian Army admit card 2025) जाहीर करण्यात आले आहे. इंडियन आर्मी अंतर्गत जनरल ड्युटी ट्रेडसमन, टेक्निकल, क्लर्क/स्टोअर किपर आणि जीडी महिला मिलिटरी पोलीस यांच्यासह अनेक पदांसाठी 30 जून ते 10 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी यशस्वीरित्या अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे हॉल तिकीट/ऍडमिट कार्ड इंडियन आर्मीच्या अधिकृत संकेतस्थळावर: joinindianarmy.nic.in उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अग्निवीर सीईई 2025 चे प्रवेशपत्र परीक्षेच्या तारखेच्या 14 दिवस आधी इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाणार आहेत.
अग्निवीर (जनरल ड्युटी) या पदाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक 16 जून 2025 रोजी सुरू करण्यात आली आहे. इतर पदांसाठी पदांसाठीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र 18 जून 2025 रोजी पासून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामध्ये अग्निवीर जीडी (जनरल ड्युटी), अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क, अग्निवीर ट्रेड्समन, महिला मिलिटरी पोलीस (WMP), सोल्जर टेक्निकल (NA/NA VET), शिपाई फार्मा आणि जेसीओ या पदांचा समावेश आहे.
अग्निवीर जीडी पदासाठीची लेखी परीक्षा ३० जून २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत घेतली जाईल. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्रे joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येतील. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी आणि पुढील प्रक्रियेसाठी नियमितपणे वेबसाइटला भेट द्यावी.
अग्निवीर CEE परीक्षा 2025 चे सुधारित वेळापत्रक
अग्निवीर पदांसाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षा (CEE) 2025 चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विविध पदांसाठीच्या परीक्षा खालील तारखांना आयोजित केल्या जातील:
• अग्निवीर (जनरल ड्युटी) पदासाठीची परीक्षा 30 जून ते 3 जुलै 2025 या कालावधीत होईल.
• अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) पदाची परीक्षा 3 जुलै ते 4 जुलै 2025 रोजी घेतली जाईल.
• अग्निवीर (टेक्निकल) पदासाठीची परीक्षा 4 जुलै 2025 रोजी निर्धारित आहे.
• अग्निवीर ट्रेड्समन (8वी उत्तीर्ण) आणि अग्निवीर GD (महिला मिलिटरी पोलीस) या पदांसाठीची परीक्षा 7 जुलै 2025 रोजी होणार आहे.
• सोल टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट), हवालदार एज्युकेशन (IT/सायबर, इन्फो ऑप्स, लिंग्विस्ट) या पदांसाठीची परीक्षा 8 जुलै 2025 रोजी होईल.
• सिपाही (फार्मा), JCO RT, JCO केटरिंग, आणि हवालदार सर्व्हेअर ऑटो कार्टोग्राफर या पदांसाठीची परीक्षा 9 जुलै 2025 रोजी आयोजित केली जाईल.
• अग्निवीर (क्लर्क/SKT) आणि अग्निवीर क्लर्क/SKT (टायपिंग टेस्ट) या पदांसाठीची परीक्षा 10 जुलै 2025 रोजी घेण्यात येईल.
लेखी परीक्षेचे स्वरूप
ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQs) विचारले जातील. उमेदवाराने कोणत्या श्रेणीसाठी अर्ज केला आहे, यानुसार परीक्षेचा कालावधी आणि प्रश्नांची संख्या निश्चित होईल. अर्जाच्या श्रेणीनुसार 1 तासात 50 प्रश्नांची किंवा 2 तासात 100 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. या परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% नकारात्मक गुण (Negative Marking) दिले जाणार आहेत. परीक्षा पद्धती संदर्भात अधिक माहितीसाठी इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
अग्निवीर भरती प्रक्रिया 2025 खालील प्रमुख टप्प्यांमध्ये घेतली जाईल:
- लेखी परीक्षा
सुरुवातीला उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित या विषयांवर प्रश्न विचारले जातील.
- शारीरिक चाचणी
लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवारांची शारीरिक चाचणी आणि कार्यक्षमता चाचणी घेतली जाईल. यामध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी आणि इतर शारीरिक चाचण्यांचा समावेश असेल.
- वैद्यकीय चाचणी
शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेतली जाईल. यामध्ये उमेदवाराच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने दृष्टी, श्रवण शक्ती आणि इतर शारीरिक तपासण्यांचा समावेश असतो. यामध्ये उमेदवार निरोगी असल्याचे खात्री केली जाते.
- कागदपत्रांची पडताळणी
अंतिम टप्प्यात, निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्रे, जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि इतर आवश्यक कागदपत्रे तपासली जातात. सर्व कागदपत्रे वैध आणि योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण होते.
अग्निवीर भरती २०२५ चे प्रवेशपत्र डाउनलोड कसे करावे?
• सर्वप्रथम, तुम्हाला इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाइट: joinindianarmy.nic.in वर जावे लागेल.
• होम पेजवर गेल्यानंतर, तुम्हाला ‘लॉगिन’ वर क्लिक करावे लागेल.
• त्यानंतर, तुमच्या लॉगिन क्रेडेन्शियल्स म्हणजेच वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड (User Id and password) वापरून अचूक माहिती भरावी लागेल.
• योग्य माहिती भरल्यानंतर, तुमचे डॅशबोर्ड तुमच्यासमोर उघडेल. तिथे तुम्हाला ‘ऍडमिट कार्ड’ नावाच्या बटणावर क्लिक करायचे आहे.
• त्यानंतर, तुमचे प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
• त्याची प्रिंटआउट घेण्यासाठी ‘प्रिंट पेज’ बटणावर क्लिक करा.
• अशा प्रकारे, तुम्ही तुमचे ‘इंडियन आर्मी अग्निवीर’ प्रवेशपत्र २०२५ यशस्वीरित्या डाउनलोड करू शकता.

My name is Manish Mule, and I bring four years of dedicated experience to content creation. I currently serve as a Digital Content Producer for the Kolgaonlive24.in web portal.