IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत तब्बल 13217 पदांची मोठी भरती | IBPS Recruitment 2025

IBPS Recruitment 2025: आयबीपीएस (Institute of Banking Personnel Selection) ने सीआरपी आरआरबी-XII साठी आयबीपीएस क्लर्क आणि पीओ परीक्षेसाठी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर (ibps.in) एक सूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १३,२१७ पदे भरली जाणार आहेत. ऑनलाइन नोंदणी १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होईल आणि २१ सप्टेंबर २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल.

पात्र आणि इच्छुक उमेदवार या तारखेपूर्वी बँकेच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे देशभरातील प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये ऑफिस असिस्टंट (लिपिक), ऑफिसर स्केल-I/PO (सहाय्यक व्यवस्थापक), ऑफिसर स्केल-II (व्यवस्थापक) आणि ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) या पदांसाठी निवड केली जाईल. ही परीक्षा सामान्य भरती प्रक्रियेद्वारे (सीआरपी-आरआरबी-XII) घेतली जाईल.

पदांची माहिती

या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश आहे, त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय), ऑफिसर स्केल-I (सहाय्यक व्यवस्थापक), ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी, पणन अधिकारी, ट्रेझरी मॅनेजर, कायदा अधिकारी, सीए, आयटी, सामान्य बँकिंग अधिकारी), आणि ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक).

एकूण पदे: १३,२१७

शैक्षणिक पात्रता: प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, अधिक तपशीलासाठी मूळ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग – ₹८५०/- आणि राखीव प्रवर्ग – ₹१७५/-.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १ सप्टेंबर २०२५

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ सप्टेंबर २०२५

अधिकृत वेबसाइट: www.ibps.in

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा