बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ५०० रिक्त जागांची भरती | Bank of Maharashtra Recruitment 2025

Bank of Maharashtra Recruitment 2025: बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) अंतर्गत जनरलिस्ट ऑफिसर पदासाठी नुकतीच भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ५०० रिक्त जागा भरल्या जातील. यासाठी अर्ज करण्यास इच्छुक व पात्र उमेदवार ३० ऑगस्ट २०२५ या अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारत सरकार किंवा त्याच्या नियामक संस्थांद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

पदवी परीक्षेमध्ये सर्व सेमिस्टर किंवा वर्षांच्या एकूण गुणांमध्ये किमान ६०% गुण (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ५५%) मिळवलेले असावेत.

किंवा चार्टर्ड अकाउंटंट ही शैक्षणिक पात्रता देखील ग्राह्य धरली जाईल. या पदांसाठी वयोमर्यादा २२ ते ३५ वर्षांपर्यंत आहे.

या पदासाठी अर्ज शुल्क UR / EWS / OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. १,१८०/- आणि SC / ST / PwBD प्रवर्गासाठी रु. ११८/- आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना रु. ६४,८२० ते रु. ९३,९६० पर्यंत वेतन दिले जाईल. अधिक माहितीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा