महावितरण नागपूर येथे 228 रिक्त पदांची भरती सुरू | Mahavitaran Nagpur Recruitment 2025

Mahavitaran Nagpur Recruitment 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), नागपूर यांच्या आस्थापनेवर ‘वीजतंत्री’, ‘तारतंत्री’ आणि ‘कोपा’ या पदांसाठी शिकाऊ उमेदवारांची भरती जाहीर झाली आहे.

एकूण 228 रिक्त जागा असून, यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि आयटीआय आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून, वयोमर्यादा 18 ते 32 वर्षे आहे.

नागपूर येथे नोकरी करण्याची संधी असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 सप्टेंबर 2025 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिक माहितीसाठी www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

पदनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे:

वीजतंत्री: 109 पदे

तारतंत्री: 44 पदे

कोपा: 60 पदे

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा