पुणे येथील नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध 131 पदांची भरती

Navsahyadri Education Society Pune recruitment 2025: नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक संचालक या पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

एकूण १३१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात.

पदांची नावे आणि संख्या:

  • प्राध्यापक: १२
  • सहयोगी प्राध्यापक: २९
  • सहायक प्राध्यापक: ८८
  • ग्रंथपाल: ०१
  • शारीरिक संचालक: ०१

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरील अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून तो ‘अध्यक्ष, नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी, गट नं. ६९, ७०, ७१, नायगाव, ता. भोर, जि. पुणे – ४१२२१३’ या पत्त्यावर पाठवायचा आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला (https://www.navsahyadri.edu.in/) भेट देऊ शकता.

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा