DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! महागाई भत्त्यात ३-४% वाढ होण्याची शक्यता!

Government Employee DA hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सरकारकडून लवकरच महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात येणार असून, जुलै महिन्यापासून हा भत्ता वाढीव दराने लागू होण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत होऊ शकतो.

महागाई भत्त्यात किती वाढ अपेक्षित आहे?

मे २०२५ मध्ये AICPI-IW (All India Consumer Price Index) ०.५ अंकांनी वाढून १४४ झाला आहे. मार्च ते मे महिन्यादरम्यान हा इंडेक्स सातत्याने वाढत आहे; मार्चमध्ये तो १४३ होता, तर मे महिन्यात १४४ झाला. AICPI-IW च्या आधारावरच महागाई भत्त्यात वाढ निश्चित केली जाते. यामुळे, जुलै महिन्यात महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्के आहे. जुलै महिन्यापासून वाढणारा महागाई भत्ता हा जून २०२५ च्या AICPI-IW वर अवलंबून असेल, ज्याचा डेटा ऑगस्ट महिन्यात जाहीर केला जाईल. जर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली, तर तो ५८ टक्के होईल. याउलट, जर ४ टक्क्यांनी वाढ झाली, तर महागाई भत्ता ५९ टक्के होणार आहे.

हे पण वाचा » भारतीय रेल्वेत 06238 पदांची मोठी भरती सुरु; ऑनलाईन अर्ज करा

महागाई भत्त्याची घोषणा कधी होणार?

जून २०२५ च्या CPI-IW चा डेटा जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. या आकडेवारीवर आधारितच महागाई भत्ता निश्चित केला जाईल. त्यामुळे, हा भत्ता जुलै महिन्यापासून लागू केला जाईल आणि जेव्हा तो लागू होईल, तेव्हा जुलैपासूनची वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारात समाविष्ट केली जाईल.