Indian Navy Recruitment 2025: भारतीय नौदलाने विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. स्टाफ नर्स, चार्जमन, असिस्टंट आर्टिस्ट रिटॉचर, फार्मासिस्ट, स्टोअर सुपरिटेंडेंट, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, स्टोअर कीपर/स्टोअरकीपर (आर्ममेंट), सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड, ट्रेड्समन मेट, पेस्ट कंट्रोल वर्कर, भंडारी, लेडी हेल्थ व्हिजिटर, मल्टी टास्किंग स्टाफ आणि ड्राफ्ट्समन या पदांसाठी एकूण १११० हून अधिक रिक्त जागा उपलब्ध आहेत.
या भरतीसाठी १८ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी १८ जुलै २०२५ या अंतिम तारखेपूर्वी आपले अर्ज दिलेल्या लिंक द्वारे सादर करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईटला (https://www.indiannavy.nic.in/) भेट देऊ शकता. प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

माझे नाव मनीष मुळे आहे. मी एक कंटेंट रायटर आहे आणि मागील 4 वर्षांपासून नोकरी, सरकारी योजना, इत्यादी महत्वाच्या विषयांवर ब्लॉग आर्टिकल लिहितो. आता मी kolgaonlive24.in या वेबसाइट साठी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून काम करतो आहे.