लाडक्या बहिणींना जून महिन्याचे १५०० रुपये ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार! | Ladaki Bahin June Hapta

Ladaki Bahin June Hapta: महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत राबविली जाणारी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अतिशय लोकप्रिय ठरली आहे. या योजनेच्या मे महिन्यापर्यंतचे सर्व हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींचा खात्यावर जमा झाल्यानंतर, आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. योजना सुरू झाल्यापासून साधारणतः महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्यापुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात वर्ग केला जात होता. आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना 11 हप्त्याची रक्कम देण्यात आलेली आहे. जून महिन्याचा 12 वा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागून राहिले आहे.

बहिणींना एकत्रित 3000 मिळणार ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 11 हप्त्यांचे 1500 रुपये प्रमाणे 16500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. ही रक्कम महाराष्ट्र शासनाच्या डीबीटी प्रणाली मार्फत लाभार्थ्यांना दिली जाते. योजना सुरू झाल्यानंतर जुलै 2024 पासून ही रक्कम लाभार्थी महिलांना देण्यात येत आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाच वेळी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली होती. त्याचप्रमाणे, जून आणि जुलै या महिन्यांची एकत्रित रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंबंधी महिला व बालविकास विभाग यांच्याकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

या महिलांना मिळणार फक्त 500 रुपये

ही योजना सुरू करतेवेळी शासनाकडून काही अटी घालून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, काही महिलांना पंधराशे रुपयांच्या ऐवजी 500 रुपये दिले जातात. ज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना केंद्र सरकारकडून 6 हजार रुपये प्रति वर्ष आणि राज्य शासनाकडून 6 हजार रुपये प्रति वर्ष म्हणजेच एकूण 12 हजार रुपये दिले जातात. अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना पंधराशे रुपयांच्या ऐवजी 500 रुपये दिले जात आहेत. म्हणजेच त्यांना एकूण 18 हजार रुपये प्रति वर्ष लाभ दिला जातो.

या लाडक्या बहिणींना मिळणार ₹1 लाखांपर्यंत कर्ज

‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी महिला राज्य शासनाशी थेट जोडल्या गेल्या आहेत. अनेक महिलांनी या निधीचा उपयोग छोट्या उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी केला असून, काहींनी तर आपले व्यवसायही सुरू केले आहेत. विशेषतः मुंबईतील महिलांसाठी आता आणखी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. या महिलांना आता शून्य टक्के व्याजदराने ₹1 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मुंबई बँक या योजनेच्या लाभार्थी महिलांना कर्जपुरवठा करणार असून, यापूर्वी ९% व्याजदराने मिळणारे कर्ज आता शून्य टक्के व्याजदरावर मिळणार असल्याची माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.

हे पण वाचा » मोफत संधी! UIDAI ने आधार अपडेटची मुदत वाढवली; जाणून घ्या प्रक्रिया आणि शेवटची तारीख!

१२% पर्यंत व्याजाचा परतावा दिला जाईल

राज्य सरकारच्या चार महामंडळांमार्फत महिलांना दिल्या जाणाऱ्या विविध योजनांतून कर्जावरील व्याजाची परतफेड केली जाते. उदाहरणार्थ, पर्यटन महामंडळाची ‘आई योजना’, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या-विमुक्तांसाठीचे महामंडळ आणि ओबीसी महामंडळ यांच्या योजनांतून महिलांना १२% पर्यंत व्याजाचा परतावा मिळतो.

या चारही महामंडळांनी एकत्र येत महिलांसाठी शून्य टक्के व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार, ज्या महिला या योजनांच्या निकषात बसतील, त्यांना बँकेकडून कर्ज देण्यात येईल व त्यावरील व्याज शासन परत करेल.

महिला उद्योजकतेला चालना

या योजनेंतर्गत एका महिलेला ₹1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. तसेच, ५ ते १० महिला एकत्र येऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील हे कर्ज उपयुक्त ठरणार आहे. हे कर्ज वाटप करण्यापूर्वी बँकेकडून त्या महिलांचा व्यवसाय आणि त्यांची संकल्पना काय आहे ते तपासले जाईल. मुंबई शहरातील जवळपास १२ ते १३ लाख महिला ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यापैकी सुमारे १ लाख महिला मुंबई बँकेच्या सदस्य आहेत. त्यामुळे ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे.

हे पण वाचा » नितीन गडकरींची मोठी घोषणा, ₹3000 मध्ये वर्षभर टोल फ्री? फास्टटॅग वार्षिक पास कसा काढायचा? जाणून घ्या!

या महिलांचा लाभ बंद होणार!

‘लाडकी बहीण’ योजनेमधे होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी सरकारनं आता अधिक काटेकोर पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) या योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक माहिती देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ₹2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांची यादी तयार केली जाईल आणि या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार ?

जून 2025 चा लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांना या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंदाजे 29 ते 30 जून यादरम्यान डीबीटी प्रणालीद्वारे खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. यासंबंधी महिला व बाल विकास विभागामार्फत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.