धनलक्ष्मी बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी! जाणून घ्या… पात्रता, अर्ज प्रक्रिया | Dhanlaxmi Bank Recruitment 2025

Dhanlaxmi Bank Recruitment 2025: धनलक्ष्मी बँक लिमिटेड यांनी ज्युनियर ऑफिसर आणि असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासंबंधीची अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी 23 जून 2025 ते 12 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. धनलक्ष्मी बँक लिमिटेड भरती 2025 संबंधित पात्रता निकष, उमेदवाराची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, निवड प्रक्रिया, अधिकृत जाहिरात, इत्यादींची सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेऊ.

आवश्यक पात्रता निकष

जूनियर ऑफिसर पदासाठी उमेदवाराचे वय 21 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ते 21 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार, ज्युनिअर ऑफिसर पदासाठी अर्जदार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह पदवी (UG) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी (PG) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क

या भरतीचे अर्ज शुल्क 708 आहे. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. हे शुल्क डेबिट कार्ड (रुपे/ व्हिसा/ मास्टरकार्ड/ मेस्ट्रो), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड किंवा मोबाइल वॉलेट वापरून भरता येईल. या भरतीची परीक्षा दिल्ली/एनसीआर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/एमएमआर, अहमदाबाद/गांधीनगर, हैदराबाद, विजयवाडा/गुंटूर, बेंगळूरु, चेन्नई, कोईम्बतूर, कोझिकोड, त्रिशूर, एरणाकुलम आणि तिरुवनंतपुरम या प्रमुख शहरांमध्ये घेतली जातील.

अर्ज कसा करावा

अर्ज फक्त धनलक्ष्मी बँकेच्या वेबसाइटद्वारे (www.dhanbank.com/careers) ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी स्कॅन केलेले रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि इंग्रजीमध्ये हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन पेमेंट आणि वैध ईमेल आयडी व मोबाईल नंबर आवश्यक आहे. या भरतीचे अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून, अर्जामध्ये उमेदवारांनी स्वतःचा वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर नमूद करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी धनलक्ष्मी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.

अर्ज नोंदणी प्रक्रिया

धनलक्ष्मी बँक लिमिटेड भरती 2025 ची अर्ज प्रक्रिया आपण जाणून घेऊ. सर्वप्रथम उमेदवारांना https://www.dhanbank.com/careers या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करायचे आहे.
त्यानंतर ‘Apply Online’ या पर्यायावर क्लिक करावे.
नवीन नोंदणीसाठी ‘Click here for New Registration’ या टॅबवर क्लिक करून उमेदवारांनी स्वतःचे नाव, संपर्काचा तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करावा.
ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दिला जाईल.
त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती प्रविष्ट करून उमेदवारांनी अर्ज पूर्ण करावा.
त्यानंतर ‘Payment’ टॅब वर क्लिक करून अर्जाचे शुल्क भरावे.
शेवटी ‘Submit’ या बाटणवर क्लिक करावे.
अशाप्रकारे तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट केला जाईल.

ऑनलाइन परीक्षा पद्धती

ऑनलाइन परीक्षा एकूण २०० प्रश्नांची असून ती पाच विषयांमध्ये विभागली आहे. या परीक्षेचा कालावधी १२० मिनिटांचा म्हणजेच २ तासांचा असेल. परीक्षेचे स्वरूप आणि त्यासाठी निर्धारित वेळ खालीलप्रमाणे आहे:

अ. क्र. परीक्षेचे नाव प्रश्नांची संख्या
1 रिझनिंग 40
2 इंग्रजी भाषा 40
3 क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 40
4 जनरल अवेअरनेस 40
5 कॉम्प्युटर नॉलेज 40
एकूण 200

प्रत्येक प्रश्नासाठी पाच पर्याय दिले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ (एक-चतुर्थांश) गुण वजा केले जातील. उमेदवाराने दिलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तरासाठी मिळालेले गुण आणि चुकीच्या उत्तरांसाठी वजा केलेल्या गुणांच्या आधारे निवड यादी तयार करण्यात येईल.

हे पण वाचा » स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 541 जागांची भरती; पात्रता, पगार, अर्ज जाणून घ्या!

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना

ऑनलाइन परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी www.dhanbank.com/careers या वेबसाइटला भेट द्यावी. उमेदवारांना ईमेल/एसएमएसद्वारे देखील याबद्दल माहिती पाठवली जाईल. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक/रोल नंबर आणि पासवर्ड/जन्मतारीख ही माहिती विचारली जाऊ शकते.

प्रवेशपत्रावर अर्ज करताना अपलोड केलेला फोटो चिकटवलेला असावा.
• परीक्षेला येताना, उमेदवाराने स्वतःचे ओरिजिनल ओळखपत्र (उदा. पॅन कार्ड/पासपोर्ट/ कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स/ मतदार कार्ड/ फोटोसह बँक पासबुक/आधार कार्ड/ई-आधार कार्ड) इ. सोबत आणावे.
• ओळखपत्राची एक फोटोकॉपी सोबत ठेवावी.

अधिकृत जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज

धनलक्ष्मी बँक लिमिटेड भरती 2025 चा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहीरात सविस्तर वाचावी. अधिक माहितीसाठी बँकेच्या संकेतस्थळावर भेट द्या.